शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०

दीपावली उत्सव मार्गदर्शक सूचना – २०२०

कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा दीपावली उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 

           त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

  • .       राज्यात अद्यापही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. मागील सात आठ महिन्यांत ज्या पद्धतिने सर्व धर्मीय सण/ उत्सव साध्या पद्धतिने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले. त्याच प्रमाणे वर्षीचा दीपावली उत्सव कोविड कालावधीत साजऱ्या केलेल्या अन्य उत्सवांप्रमानेच पूर्ण घबरदारी घेवून अत्यंत साध्या पद्धतिने साजरा करावा.
  • .       या उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उपक्रम/कार्यक्रम उदा. दीपावली पहाट आयोजित करण्यात येवू नयेत. आयोजित करावयाचे झाल्यास आनलाईन,केबल नेटवर्क, फेसबुक ई. माध्यमांद्वारे त्याचे प्रसारण करावे.
  • .       सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राध्यान देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू ई. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणवर एकत्रित येवू नये, याची दक्षता घेण्यात यावी.
  • .       कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण,वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका,पोलीस,स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

            हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासन, गृह विभाग यांच्या वतीने दि. ०५-११-२०२० रोजी प्रसिद्ध केले असून त्याचा संकेताक २०२०११०५१६४३३७१७२९ असा आहे.

 वरील परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वापरा.

https://drive.google.com/file/d/1jHVzPMu6CwlMEQwXgjmOij14-o7qj3dW/view

टीम- प्राकृत फूड्स

---------------------------------------------------------------------------------------------------------------------शेतकरी मित्रांनो,  शेतीविषयक शासकीय योजना, शासकीय धोरणे व शासन या विषयात घेत असलेल्या निर्णयांबाबत आपण सर्वसामान्य शेतकरी अनभिज्ञ असतो. त्यामुळेच आपल्या शेतकऱ्यांना शासनाच्या योजना माहिती ही होत नाहीत आणि लाभही मिळत नाही.

             हिच शेतकर्यांची समस्या लक्षात घेऊन

                           प्राकृत फुड्सने हाच शासकिय पातळीवरील व शेतकऱ्यांना मध्ये असलेल्या गॅप भरुन काढून महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन शेतीविषयक निघणारे परिपत्रके, शेतकऱ्यांन संबंधित घेतले जाणारे निर्णय थेट शेतकऱ्यांच्या व्हॉट्सऍप वर उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे

या योजनेत सहभागी होण्यासाठी शुल्क खालील लिंक वरून जमा करावे.

                https://rzp.io/l/8Qan21ocm

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सर्वात अलीकडील प्रकाशित पोस्ट

शाळा व वसतिगृहे (आदिवासी विभागाअंतर्गातील ) सुरु करणे बाबत...

                                    राज्यातील आदिवासी विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळांतील विद्यार्थ...

सर्वाधिक लोकप्रिय