शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

शाळा व वसतिगृहे (आदिवासी विभागाअंतर्गातील ) सुरु करणे बाबत...

                                    राज्यातील आदिवासी विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळांतील विद्यार्थांचे प्रत्यक्ष प्रथम: ई. ९ वी ते १२ वी चे             वर्ग ०१ डिसेंबर, २०२० पासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच   ई. ९ वी ते १२ वीच्या या विभागांतर्गत असलेले शासकीय वसतिगृहे  सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

  शाळा व वसतिगृहे सुरु करण्यापूर्वी 


आरोग्य,स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांच्या बाबत मार्गदर्शक सूचना :

 • हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे.
 • थर्मोमिटर, थर्मल स्कॅनर, प्लस ऑक्सिमीटर, जंतुनाशक साबण, पाणी ई. उपलब्ध करावे.
 • शाळा / वसतिगृहाची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे.
 • शाळा व वसतिगृहातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांची दि. २३ ते २९ नोव्हेंबर या दरम्यान कोविड १९ साठीची RTPCR चाचणी करणे बंधनकारक असेल.
 • वर्गखोली तसेच स्टाफ रूम / वसतिगृहातील खोल्मयांधील बैठक व्यवस्था शारिरीक अंतर (Physical Distancing) च्या नियमांनुसार असावी.
 • वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था असावी.
 • वसतिगृहात एका खोलीत कमाल दोन विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था करावी.
 • थुंकण्याचावरील बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
 • शारिरीक अंतर राखण्यासाठी येण्या व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणाऱ्या बाणांच्या खुणा दर्शविण्यात याव्यात.
 • परिपाठ, स्नेह संमेलन, क्रीडा व ई. तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल.
 • शिक्षक-पालक बैठका ऑनलाईन घ्याव्यात.
 • विद्यार्थ्यांना शाळेत/वसतिगृहात उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक असेल.
 • विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरी राहून देखील अभ्यास करता येईल.
 • विद्यार्थांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णतः पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल.
 • शाळेत/वसतिगृहात दर्शनी भागावर Physical Distancing, मास्कचावापर ई. संदर्भात मार्गदर्शक सूचना असणारे पोस्टर्स / स्टिकर प्रदर्शित करावे.
 • शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरिता किमान सहा फूट शारिरीक अंतर राखले जाईल या करिता विशिष्ठ चिन्हे जसे चौकोन, वर्तुळ ई. वापर गर्दी होण्याऱ्या ठिकाणी जसे पाणी पिण्याच्या सुविधा, हात धुण्याच्या सुविधा, स्वच्छतागृहे ई. ठिकाणी करण्यात याव्यात.

 शाळा व वसतिगृहे सुरु झाल्यानंतर


आरोग्य,स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांच्या बाबत मार्गदर्शक सूचना :

 • शाळेचा/वसतिगृहाचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जावा.
 • शाळा/वसतिगृहातील खोल्या व वर्गखोल्यांच्या बाहेरील नेहमी स्पर्श होणारा पृष्ठ भाग जसे लचेस, अध्ययन-अध्यापन साहित्य, डेस्क, टेबल, खुर्च्या ई. वारंवार स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
 • शाळा/वसतिगृह व परिसरातील कचऱ्याची नियमितपणे विल्हेवाट लावावी.
 • हात धुण्याच्या सर्व ठिकाणी साबण, हान्डवाश व स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी.
 • स्वच्तागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
 • वरील सर्व स्वच्छतेमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेवू नये.
 • विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची दररोज साधी आरोग्य चाचणी जसे Tharmal Screening घेण्यात यावी.
 • विविध इयत्तांचे वर्ग सुरु व संपण्याच्या वेळामध्ये १० मि. अंतर असावे.
 • ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला असेल त्यांच्यासाठी ऑनलाईन गृहपाठाची व्यवस्था करावी.
 • शाळा व्यवस्थापन समितीने शाळेतील गर्दी टाळण्यासाठी एक दिवसाआड विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे.  ( ५० टक्के विद्यार्थी एका दिवशी व ५० टक्के विद्यार्थी दुसऱ्या दिवशी  ) अशाप्रकारे एकाच दिवशी ५०टक्के विद्यार्थी अनलॉक वर्गात व उर्वरित ५० टक्के विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहून शिक्षण घेतील.
 • प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी ३ ते ४ तासांपेक्षा अधिक असू नये.
उपरोक्त सूचना व्यतिरिक्त स्थानिक परिस्थितीनुसार शाळांनी आवश्यक मार्गदर्शक सूचना निश्चित कराव्यात.

सदर शासन परिपत्रक ( आदिवासी विकास विभाग ) महाराष्ट्र शासनाने दि. २० नोव्हेंबर २०२० रोजी काढला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२०११२०११३५२१०३२४ असा आहे.

अधिकृत परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.

https://drive.google.com/file/d/1Rtl58lZPcnM7nt_VSPHRhfH-5182TS4x/view?usp=sharing

                                         टीम - प्राकृत फूड्स 
==============================================================

महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन शेतीविषयक निघणारे परिपत्रके, शेतकऱ्यांन संबंधित घेतले जाणारे निर्णय थेट शेतकऱ्यांच्या व्हॉट्सऍप वर उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे.
आमच्या व्हॉट्सऍप गृपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर आपली माहिती पाठवा.
 धन्यवाद.....शेतकऱ्यांना गोठे/शेड साठी योजना

 

 हरघर गोठे घरघर गोठे योजना


शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नवाढीसाठी व ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मित्ती होण्यासाठी, ग्रामीण भागामध्ये सामाजिक पायाभूत सोयी-सुविधांच्या माध्यमातून कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण करून उपलब्ध करून देणे हाही या योजनेचा उद्देश आहे. सद्यस्थितीत राज्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विविध प्रकारची कामे हाती घेण्यात येत असून या माध्यमातून सार्वजनिक व वैयक्तिक मालमत्तेचे निर्माण करण्यात येत आहे.

        सदर उपक्रमातून शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक मालमतेचे  निर्माण करण्याबरोबर ग्रामीण भागात रोजगार निर्मित्ती देखील होणार आहे. 

प्रस्तावित कामे

 • गाय म्हैस यांच्याकरिता गोठ्यात पक्के तळ आणि मुत्रसंचय टाकी बांधणे.
 • बचत गटांच्या जनावरांसाठी सामुहिक गोठे बांधणे.
 • कुक्कुटपालन शेड (निवारा) बांधणे.
 • शेळीपालन शेड (निवारा) बांधणे.

                                           या उपक्रमा अंतर्गत वरील मालमत्तांची निर्मिती करण्यात येणार आहे.

सदर योजनेतील उपक्रमाद्वारे मागेल त्याला काम मिळेल, लोकांचे स्थलांतरण थांबविले जाईल, शेतकरी स्वावलंबी होईल आणि गावे समृद्धीकडे वाटचाल करतील.

  सदर परिपत्रकान्वये सर्व जिल्हा परिषदांना सूचित करण्यात येते कि, सदर योजने अंतर्गत नियोजन विभागाच्या नमूद सर्व शासन परिपत्रक/शासन निर्णयामधील अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करून अनुज्ञेय असलेल्या कामांसाठी पुणे जिल्हा परिषद व कोल्हापूर जिल्हा परिषदेप्रमाणे नाविन्य पूर्ण उपकर्म प्रस्तावित करून ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे जेणेकरून शेतकऱ्यांसाठी मालमत्तेचीही निर्मिती होईल.


सदर शासन परिपत्रक ( ग्रामविकास विभाग ) महाराष्ट्र शासनाने दि. १० नोव्हेंबर २०२० रोजी काढला असून त्याचा संकेत क्रमांक 201804131143259816 असा आहे.

अधिकृत परिपत्रक व डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.

https://drive.google.com/file/d/1RkOt1Vt9wMCVgQgjpL-q2IBE31128GZt/view?usp=sharing

 1. संदर्भ पत्र : दि. ९ ऑक्टोबर २०१०
 2. दि.१ ऑक्टोबर २०१६
 3. दि. ५ नोव्हेंबर २०१८
 4. दि. ५ ऑगस्ट २०२०
 5. दि. २ ऑक्टोबर २०२०

                                         टीम - प्राकृत फूड्स 

महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन शेतीविषयक निघणारे परिपत्रके, शेतकऱ्यांन संबंधित घेतले जाणारे निर्णय थेट शेतकऱ्यांच्या व्हॉट्सऍप वर उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे.

                आमच्या व्हॉट्सऍप गृपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर आपली माहिती पाठवा.

       https://wa.me/message/LHK22JQ7S6CXI1

                   धन्यवाद.....गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०२०

कौमी एकता सप्ताह (१९-२५ नोव्हें 20 ) साजरा करणे बाबत...

                                         कौमी एकता सप्ताह हा देशातील सामाजिक सद्भाव , सुसंवाद, राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी भारतात साजरा केला जातो. भारतात कौमी एकता सप्ताह हा केंद्र शासनाने सन १९८६ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार तेंव्हा पासून साजरा केला जातो. सप्ताहाची सुरुवात १९ नोव्हेंबर ला राष्ट्रीय एकात्मता दिवसाला सुरुवात होऊन २५ नोव्हेंबर ला जोपासना दिवसाने समाप्त होतो. 

कौमी एकता सप्ताह -२०२०

कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाची पार्श्व भूमी लक्षात घेवून लोकसहभागाबाबत योग्य घाबरदारी घेवून खालील प्रमाणे कार्यकर्म आयोजित करण्यात यावेत.

 • १९ नोव्हेंबर (गुरुवार) - राष्ट्रीय एकात्मता दिवस 

 • २० नोव्हेंबर (शुक्रवार) - अल्पसंख्यांक कल्याण दिवस 
 • २१ नोव्हेंबर (शनिवर) - भाषिक सुसंवाद दिवस  
 • २२ नोव्हेंबर (रविवार) - अल्पसंख्यांक कल्याण दिवस 
 • २३ नोव्हेंबर (सोमवार) - अल्पसंख्यांक कल्याण दिवस 
 • २४ नोव्हेंबर (मंगळवार) - अल्पसंख्यांक कल्याण दिवस 
 • २५ नोव्हेंबर (बुधवार) - अल्पसंख्यांक कल्याण दिवस 

 या दिनानिमित्त सभा, चर्चासत्रे व परिसंवाद, ऑनलाइन वेबीनार ई. पद्धतीने आयोजित करावेत.


सदर शासन परिपत्रक नियोजन विभाग (रोह्या प्रभाग) महाराष्ट्र शासनाने दि. १२ एप्रिल २०१८ रोजी काढला असून त्याचा संकेत क्रमांक 201804131143259816 असा आहे.

अधिकृत परिपत्रक व अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.

https://drive.google.com/file/d/1Q25qqFzVDJjqkETQneDalj0Pktaxa4Fr/view?usp=sharing

(परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी समस्या आल्यास 7504832020 या  क्रमांकावर संपर्क करावा.)


                                         टीम - प्राकृत फूड्स 

महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन शेतीविषयक निघणारे परिपत्रके, शेतकऱ्यांन संबंधित घेतले जाणारे निर्णय थेट शेतकऱ्यांच्या व्हॉट्सऍप वर उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे.

                आमच्या व्हॉट्सऍप गृपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर आपली माहिती पाठवा.

       https://wa.me/message/LHK22JQ7S6CXI1

                   धन्यवाद.....20 ते 24 नोव्हें विदर्भ ,मराठवाडातील काही भागात पावसाची शक्यता... श्री.पंजाब डख

पूर्वकल्पना:- ता. 20 ते 24 दरम्याण विदर्भ ,मराठवाडा तील काही तूरळक भागात  पावसाची शक्यता आहेच  -पंजाब डख


श्री.पंजाब डख                        

CTC-ATDअंशकालिन शिक्षक

18/11/20 वेळ 1:47


ता .-25 तारखेपासूण राज्यात थंडी वाढेल.

 

बुलढाणा,औरंगाबाद,जालना,परभणी,नादेंड, अहमदनगर,लातूर,सोलापूर,उस्मानाबाद,बिड, कोल्हापूर,सागंली,पूणे,नाशिक,मुंबई या जिल्हातील तुरळक गावात पाउस अपेक्षित राहील सर्वदूर नसेल .


 🟣 माहितीस्तव👇


अरबी समुद्र व बगांल च्या  उपसागरात लहाण मोठी .Cyclone (चक्रीवादळ ) तयार होत आहेत .त्याचा महाराष्ट्रावर परिणाम जास्त पडणार नाही.तर तामीळनाडू,आध्रंप्रदेश,केरळ,कर्नाटक,श्रीलंका,या भागात जास्त प्रभाव राहील.विदर्भ,मराठवाडा,कोकणपटटी मुबंई नाशिक तूरळक काही गावात पाउस अपेक्षित राहील म्हणून शेतकऱ्यांनी सर्तक रहावे.पाउस पडल्या नतंर धूई येते.आपल्या पिकांची. काळजी ध्यावी. कारण यामध्ये धूई/धूके असते त्याचा परिणाम फुलावर होतो . गहू,हरभरा,,पेरणी करण्यास पोषख वातावरण धूई,/धूराळे/धूके पासून पिकांचे सरक्षंण करा ..


 वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गाववाही नाहीत माहीत असावे .

  

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .


शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.


 पंजाब डख

हवामान अभ्यासक

गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी (मराठवाडा )

18/11/2020

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन शेतीविषयक निघणारे परिपत्रके, शेतकऱ्यांन संबंधित घेतले जाणारे निर्णय थेट शेतकऱ्यांच्या व्हॉट्सऍप वर उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे.

                आमच्या व्हॉट्सऍप गृपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर आपली माहिती पाठवा.

       https://wa.me/message/LHK22JQ7S6CXI1

                   धन्यवाद.....

शासकीय योजनांची माहिती थेट व्हाट्सएपवर

 नमस्कार

शेतकरी मित्रांनो,

             शेतीविषयक शासकीय योजना, शासकीय धोरणे व शासन या विषयात घेत असलेल्या निर्णयांबाबत आपण सर्वसामान्य शेतकरी अनभिज्ञ असतो. त्यामुळेच आपल्या शेतकऱ्यांना शासनाच्या योजना माहिती ही होत नाहीत आणि लाभही मिळत नाही.

      हिच शेतकर्यांची समस्या लक्षात घेऊन

             प्राकृत फुड्सने हाच शासकिय पातळीवरील व शेतकऱ्यांना मध्ये असलेल्या गॅप भरुन काढून महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन शेतीविषयक निघणारे परिपत्रके, शेतकऱ्यांन संबंधित घेतले जाणारे निर्णय थेट शेतकऱ्यांच्या व्हॉट्सऍप वर उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे.

                आमच्या व्हॉट्सऍप गृपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर आपली माहिती पाठवा.

  https://wa.me/message/LHK22JQ7S6CXI1

                                  आपला

                           कृष्णा केशवराव गव्हाणे

                           संचालक, प्राकृत फुड्स

                  

शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२०

संत सावता माळी रयत बाजार अभियान

महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्या विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारित कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे धोरण निश्चीत करण्यात आलेले आहे. राज्य शासनाच्या या धोरणांच्या भाग म्हणून संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानाची सुरुवात करून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था व त्यासंबंधीची मूल्यसाखळी संवार्धीत करण्याचे नियोजन आहे.

      त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहेत.

 1.       .  बाझारामध्ये शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव , ग्राहकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होईल अशी संकल्पना राज्यात “संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान” राबवण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत शेतकरी/शेतकरी गट ह्या व्यवस्थेव्दारे थेट ग्रहांकांपर्यंत जोडण्यात येणार आहे.
 2.     संबंधित तालुका कृषी अधिकार्यांनी फळे,भाजीपाला व ईतर शेतमाल उत्पादित झाल्यानंतर सबंधित शेतकऱ्यांमध्ये शेतमालाची स्वच्छता व प्रतवारी करणे, ग्रेडिंग करणे, पाकिंगकरणे,विक्री व्यवस्थापन ई.बाबत तांत्रिक प्रशिक्षण व क्षमताबांधणी करावी.
 3.      संबंधित तालुका कृषी अधिकार्यांनी आपल्या तालुक्यातील शेतकरी/शेतकरी उत्पादक संघ/शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या जाळे बळकट करण्यावर भर द्यावा. जेणेकरून जास्तीचा शेतमाल दुसऱ्या गटांमार्फत /शेतकाऱ्यामार्फत विक्री करता येईल. अथवा कमी पडणारा शेतमाल दुसऱ्या गटाकडून घेता येईल व पुरवठा साखळी अविरतपणे सुरु राहील.
 4.     सदर योजनेमध्ये शेतकरी/शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या सभासदांचाच माल थेट ग्राहकांना विकण्याचे बंधन राहील.

 

                  शेतकरी/गट/उत्पादक कंपनी यांची जबाबदारी

1.       वैविध्यपूर्ण फळे व भाजीपाला उत्पादित करण्याचे नियोजन असावे.

2.       विक्रीकरिता आणण्यापूर्वी व्यवस्थित वर्गवारी करून, ग्रेडिंग,पकिंग याबाबत काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक.

3.       शेतमालाचे वजन करण्यासाठी इलेक्ट्रानिक वजनकाट्याचा वापर करणे अथवा प्रमाणित वजनकाट्याचा वापर करणे बंधनकारक राहील.

4.       सदर अभियानाच्या माध्यमातून शेतमाल विक्रीकरिता उपलब्ध करून दिलेल्या जागेवर कुणाचेही अतिक्रमण होणार नाही, मालक्की हक्क राहणार नाही.

 

या अभियानाचे समन्वयक व सनियंत्रक जिल्हास्तरावर प्रकल्प संचालक आत्मा व विभागीय उपसरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य पणन मंडळ यांनी करावे.

 

सदरचे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसायविकास व मत्सव्यवसाय विभाग यांच्यामार्फत दि.१३ नोव्हेंबर २०२० रोजी काढले असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २०२०१११३१२३०५०३८०१ असा आहे.


अधिकृत परिपत्रक व अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.

(परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी समस्या आल्यास 7504832020 या  क्रमांकावर संपर्क करावा.)


                                         टीम - प्राकृत फूड्स 

महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन शेतीविषयक निघणारे परिपत्रके, शेतकऱ्यांन संबंधित घेतले जाणारे निर्णय थेट शेतकऱ्यांच्या व्हॉट्सऍप वर उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे.

                आमच्या व्हॉट्सऍप गृपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर आपली माहिती पाठवा.

       https://wa.me/message/LHK22JQ7S6CXI1

                   धन्यवाद.....बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२०

शेतकऱ्यांच्या बांधावर व शेत जमिनीवर वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याबाबत...

शेतकऱ्यांच्या बांधावर व जमिनीवर वृक्ष लागवड कार्यक्रम वन विभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेमार्फत हाती घेण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

खालील वृक्ष लागवडीस मान्यता

 1. साग
 2. चंदन
 3. खाया
 4. बांबू
 5. सीताफळ
 6. चिंच
 7. जांभूळ
 8. बाभूळ
 9. शेवगा
 10. आंबा
 11. हादगा
 12. कडीपत्ता
 13. निम
 14. चारोळी
 15. महागोनी
 16. आवळा
 17. हिरडा
 18. बेहडा
 19. अर्जुन
 20. अंजन
 21. बिबा
 22. खैर
 23. काजू (फक्त रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हासाठी )
 24. फणस
 25. ताड
 26. शिंदी
 27. सुरु
 28. शिवण
 29. महारुख
 30. मंजीयम
 31. मेलिया डूबिया

अर्ज कुठे करावा व निकष काय ? 

 • इच्छुकांनी अर्ज ग्रामपंचायतीकडे दाखल करावा.
                (अर्ज शेवटी लिंक सोबत जोडलेला आहे.)
 •  इच्छुक लाभधारकाच्या नावे जमीन आसने आवश्यक
          ( जमीन कुळाच्या नावाने असल्यास त्यांची परवानगी )


लाभार्थी प्राध्यानक्रम

 • अनुसुचीत जाती
 • अनुसूचित जमाती
 • भटक्या जमाती
 • निरधीसूचित जमाती (विमुक्त जमाती)
 • दारिद्र रेषेखालील लाभार्थी 
 • स्त्री - कर्ता असलेली कुटुंबे 
 • शारिरीकदृष्टाविकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे
 • जमीन सुधारणांचे लाभार्थी 
 • इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी 
 • अनुसूचित जमाती व इतर परंपरागत वन निवासी अधिनियम २००६, खालील लाभार्थी 
                   वरील लाभार्थाना प्राध्यान दिल्यानंतर 
 • अल्पभूधारक शेतकऱ्यांना  लाभ दिल्या जाईल.

वृक्ष लागवडीची कालावधी

१ जून ते ३० नोव्हेंबर

लाभार्थ्यांची जवाबदारी 

 • वृक्ष लागवडीचे व संवर्धन करण्याची जवाबदारी
 • दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायती वृक्ष - ९०%
                                             कोरडवाहू वृक्ष - ७५ % झाडे जिवंत ठेवतील फक्त त्याच लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीचे अनुदान मिळेल.


महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे...

 1. लाभार्थी स्वतः जॉबकार्ड धारक असावा.
 2. जॉब कार्ड धारकाच्या खात्यावर कामाची नोंद करावी.
 3. दर १५दिवसांप्रमाणे मस्टर प्रमाणे मजुरी प्रदान करावी.
 4. संपूर्ण वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी पूर्व हंगामी मशागत कामे, खड्डे खोदणे, वृक्षांची लागवड करणे, पाणी देणे, कीटकनाशके/औषधे फवारणी व झाडांचे सरंक्षण करणे ई. कामे लाभधारकाने स्वतः व जॉब कार्ड धारक मजुरांकडून करून घेण्याची जबाबदारी लाभार्थ्यांची राहील.
 5. ईतर जॉबकार्ड धरकही काम करू शकतात व त्यांना नरेगाची मजूरी मिळू शकते.
 6. मजुरीची रक्कम फक्त पोस्ट/बँकेमार्फतच दिली जाईल.
 7. ग्रामरोजगार नोंदवहीत व ग्राम मालमत्ता नोंदवहीत सर्व प्रकारच्या नोंदी घेणे आवश्यक आहे.
सदर शासन परिपत्रक नियोजन विभाग (रोह्या प्रभाग) महाराष्ट्र शासनाने दि. १२ एप्रिल २०१८ रोजी काढला असून त्याचा संकेत क्रमांक 201804131143259816 असा आहे.

अधिकृत परिपत्रक व अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.

https://drive.google.com/file/d/1Q25qqFzVDJjqkETQneDalj0Pktaxa4Fr/view?usp=sharing

(परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी समस्या आल्यास 7504832020 या  क्रमांकावर संपर्क करावा.)


                                         टीम - प्राकृत फूड्स 

महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन शेतीविषयक निघणारे परिपत्रके, शेतकऱ्यांन संबंधित घेतले जाणारे निर्णय थेट शेतकऱ्यांच्या व्हॉट्सऍप वर उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे.

                आमच्या व्हॉट्सऍप गृपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर आपली माहिती पाठवा.

       https://wa.me/message/LHK22JQ7S6CXI1

                   धन्यवाद.....

अर्थचक्रास चालना देण्यासाठी राजकोषीय उपाययोजना

 कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या कोविड-१९ महामारीच्या काळातील लॉकडाऊनमुळे सन २०-२१ च्या अर्थ संकल्पीय अंदाजानुसार महसूल प्राप्त होत नसल्याने तसेच, या महामारीच्या काळात आरोग्य, पोलीस प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा सुरळीत ठेवणे, ई.तातडीच्या बाबींसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याने सरसकट सर्व विभाग व सर्वच बाबींसाठी निधी वितरीत करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत दरमहाचा महसुली जमेचा कल व बांधील खर्चासाठी आवश्यक निधी यांचा आढावा घेवून निधी वितरणाचा निर्णय घेणे भाग पडत आहे.

सध्याच्या महामारीच्या कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेस उभारी देण्यासाठी विविध उपाय योजना केंद्र शासन, राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत केल्या जात आहेत.

उपरोक्त परिस्थितीत राज्याच्या आर्थिक स्थितीस चालना देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्मंत्री व मंत्रिमंडळातीलइतर सदस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. सदर चर्चेतील निर्णयास अनुसरून राज्यातील रोजगार निर्मितीस चालना देणे व अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी दूरगामी उपाययोजना म्हणून पुढील बाबींना शासन मान्यता देण्यात येत आहे.

 1. ज्या विभागांमार्फत मत्त निर्मिती व पर्यायाने रोजगार निर्मितीसचालना  देण्यास भांडवली खर्च केला जातो अशा बाबींसाठी सोबतच्या परिशीष्टातील नमूद विभाग व त्यांच्या पुढे दर्शविलेल्या भांडवली लेखाशिर्षातर्गतचा सन २०-२१ साठीचा अर्थसंकल्पीत निधी ७५टक्के वितरणास मान्यता देण्यात येत आहे.
 1. आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गतचा निधी १०० टक्के वितरणास मान्यता देण्यात येत आहे.
 1. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण/अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती घटक कार्यक्रम) या अंतर्गतचा  निधी १०० टक्के वितरणास मान्यता देण्यात येत आहे.


सदर शासन परिपत्रक वित्त विभागाच्या महाराष्ट्र शासनाने दि. १० नोव्हेंबर २०२० रोजी काढला असून त्याचा संकेत क्रमांक २०२०१११०१५२०२४३२०५ असा आहे.

अधिकृत परिपत्रक डाऊनलोडकरण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.


(परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी समस्या आल्यास 7504832020 या  क्रमांकावर संपर्क करावा.)


                                         टीम - प्राकृत फूड्स 

महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन शेतीविषयक निघणारे परिपत्रके, शेतकऱ्यांन संबंधित घेतले जाणारे निर्णय थेट शेतकऱ्यांच्या व्हॉट्सऍप वर उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे.

                आमच्या व्हॉट्सऍप गृपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर आपली माहिती पाठवा.

       https://wa.me/message/LHK22JQ7S6CXI1

                   धन्यवाद.....

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०

विकेल ते पिकेल अभियान राज्यात राबविण्याबाबत

माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेवर आधारित विकेल ते पिकेल अभियान कृषी व संलग्न विभागामार्फत राज्यात राबविण्याबाबत...

                                                                                  शेतमालाच्या उत्पादकाला व ग्राहकाला काय हवे आहे याचा शोध घेऊन त्यानुसार पीक पद्धती, कृषी प्रक्रिया, पुरवठा साखळी व  विक्री व्यवस्था विकसित करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांना विकेल ते पिकेल हे अभियान मदत करेल. उत्पादक शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग, किरकोळ विक्री साखळ्या आणि  कृषी आधारित उद्योजकांच्या माध्यमातून नवीन व संघटित बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण, तांत्रिक सहाय्य, पायाभूत सुविधा आणि जोखीम निवारा क्षमता विकसित करण्यासाठी शासनाच्या विविध विभागाच्या संबंधित योजनाद्वारे गुंतवणूक केली जाईल. त्यासाठी पीकनिहाय विविध मूल्य साखळी प्रकल्प उभे करण्याला कृषी विभाग मदत करेल. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या संघ/संस्थांच्या माध्यमातून काढणीपश्‍चात हाताळणी, मूल्यवर्धित आणि प्राथमिक प्रक्रिया केलेला माल संघटित खरेदीदार, प्रक्रिया उद्योग आणि निर्यातदारांना पुरवठा करण्याची व्यवस्था उभी करण्यावर भर देण्यात येईल.

   विकेल  ते पिके अभियान उद्दिष्टे

 1. बाजारात मागणी असलेल्या पिकांच्या लागवडीवर भर देणे
 2. शेती पिकाचे अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उत्पादन घेणे.
 3. शेती व्यवसाय हा उद्योगक्षम करणे.
 4. शेतमाल विक्रीसाठी ब्रँड विकसित करणे.
 5. शेतमाल मूल्यसाखळी विकास प्रकल्पांच्या माध्यमातून बाजाराच्या वाढीव संधी उपलब्ध करणे.
 6.  कृषी व्यवसाय सुलभतेसाठी धोरणात्मक बदल करणे.
 7.  कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवणे.
 8.  शेती उत्पन्नात शाश्वतता आणणे  व निव्वळ उत्पन्नात वाढ करणे.
 9. बाजारपेठीय माहितीचे विश्लेषण करणे व  उत्पादकांना त्याची माहिती देणे.                                                                                                                     

             
                         विकेल ते पिकेल या अभियानावर काम  करत असताना सर्व ठिकाणी लगेच मोठमोठे प्रकल्प उभारणे अथवा प्रक्रिया करणे शक्य होणार नाही. तथापी शेतकरी सध्या घेत असलेल्या पिकांची/शेतमालाची प्रचलित विपणन व्यवस्थेतशिवाय ग्राहकांची जोडणी करणे काही प्रमाणात सहज शक्य आहे. त्याशिवाय ग्राहकांच्या मागणीप्रमाणे काही पिकांची जाणीवपूर्वक लागवड वाढविणे, भौगोलिक मानांकन प्राप्त पिकांचे ब्रँडिंग करणे व त्या पिकांना वाजवी दर मिळवून देणे यासाठी प्रयत्न करता येतील. यामध्ये सध्या शेतकरी येत असलेले आणि प्रक्रियेविना थेट ग्राहकोपयोगी असलेली पिके व प्रक्रियेविना वापर न होणारी पिके यांचा समावेश होतो.
                                   शेतकऱ्यांच्या मालाला ग्राहकांपर्यंत पोहोचविणे अस्तित्वात असलेल्या साखळीतील टप्पे कमी करणे, विक्री तंत्रासाठी आवश्यक किमान दर्जा, प्रतवारी, स्वच्छता व सुकविणे यासारख्या कमी खर्चाच्या परंतु खूप फरक करणाऱ्या घटकांसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.

कार्यवाहीचे स्वरूप

 1. ताजा शेतमाल/ भाजीपाला/ फळे यांची थेट विक्री
 2. विक्रेता/ खरेदीदार निवडून त्यांना शेतमालाची विक्री 
 3. पायाभूत व्यवस्थेसह प्रक्रियायुक्त शेतमालाची विक्री  

                          निधीची उपलब्धता व नियोजन

 विकेल ते पिकेल अभियानाच्या अंमलबजावणीसाठी कृषी व संलग्न विभागांच्या तसेच सहकार, पणन, नाबार्ड ई. विभागांच्या विविध योजनांची सांगड घालण्यात यावी. प्रथम विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच या गटांच्या मालाच्या  विक्रीसाठी प्रक्रियादार/निर्यातदार/सहकारी भांडार / गृहनिर्माण संस्था यांना जोडण्यात यावे. यामधून सक्षमपणे काम करणाऱ्या गटांची निवड करून त्यांचे शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये रूपांतरण करता येईल व त्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना या योजनांमधून प्राधान्याने अनुदान देता येईल. शिवाय शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणे योजनेचा लाभ घेता येईल. या शिवाय चांगले संघटन झालेले गट/ कंपन्यां यांच्या माध्यमातून माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत मूल्य साखळी विकसित करता येतील. यासाठी आवश्यक वित्तीय सहाय्य मिळवण्यासाठी कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा लाभ घेता येईल. वरील प्रत्येक योजनांचा लाभ गटांना प्राधान्याने देता येईल. यासाठी योजनांमधील (४० ते ५० टक्के) तरतूद राखीव ठेवण्यात येईल.

 हे शासन परिपत्रक कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभाग यांच्या वतीने दि. २७-१०-२०२० रोजी प्रसिद्ध केले असून त्याचा संकेताक २०२०१०२७१६५१२८४३०१ असा आहे.

 वरील परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वापरा.

https://drive.google.com/file/d/1GofRRRWS-xoC9grgp5ArXmAE5JUN6_KB/view?usp=sharing

        टीम – प्राकृत फूड्स

           ०७५०४८३२०२०             

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०

रात्री पासून राज्यात थंडीची लाट - पंजाब डख

 1.  ता . 14,15, दिवाळी च्या वेळेस अंशता ढगाळ वातावरण राहील.
 2.  उत्तरे कड़ील वारे वाहत असल्यामुळे राज्यात आज रात्री पासून  थंडी वाढणार आहे
 3. आपल्या पिकांची काळजी ध्यावी. कारण यामध्ये धूई/धूके असते त्याचा परिणाम फुलावर होतो . 
 4. गहू,हरभरा,पेरणी करण्यास पोषख वातावरण धूई/धूराळे/धूके पासून पिकांचे सरक्षंण करा .

                                       🟣 माहितीस्तव👇

 •   वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गाववाही नाहीत माहीत असावे .
 •  दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .
 • शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

 पंजाब डख
हवामान अभ्यासक
रा.किसान संस्था महाराष्ट्र राज्य
गुगळी धामणगाव ता.सेलू जि.परभणी (मराठवाडा )
06/11/2020

 ------------- टीम – प्राकृत फूड्स-------------------- 

महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन शेतीविषयक निघणारे परिपत्रके, शेतकऱ्यांन संबंधित घेतले जाणारे निर्णय थेट शेतकऱ्यांच्या व्हॉट्सऍप वर उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे

   आमच्या व्हॉट्सऍप गृपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर आपली माहिती पाठवा.

       https://wa.me/message/LHK22JQ7S6CXI1

                   धन्यवाद.....

दीपावली उत्सव मार्गदर्शक सूचना – २०२०

कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा दीपावली उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 

           त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

 • .       राज्यात अद्यापही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. मागील सात आठ महिन्यांत ज्या पद्धतिने सर्व धर्मीय सण/ उत्सव साध्या पद्धतिने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले. त्याच प्रमाणे वर्षीचा दीपावली उत्सव कोविड कालावधीत साजऱ्या केलेल्या अन्य उत्सवांप्रमानेच पूर्ण घबरदारी घेवून अत्यंत साध्या पद्धतिने साजरा करावा.
 • .       या उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उपक्रम/कार्यक्रम उदा. दीपावली पहाट आयोजित करण्यात येवू नयेत. आयोजित करावयाचे झाल्यास आनलाईन,केबल नेटवर्क, फेसबुक ई. माध्यमांद्वारे त्याचे प्रसारण करावे.
 • .       सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राध्यान देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू ई. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणवर एकत्रित येवू नये, याची दक्षता घेण्यात यावी.
 • .       कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण,वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका,पोलीस,स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

            हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासन, गृह विभाग यांच्या वतीने दि. ०५-११-२०२० रोजी प्रसिद्ध केले असून त्याचा संकेताक २०२०११०५१६४३३७१७२९ असा आहे.

 वरील परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वापरा.

https://drive.google.com/file/d/1jHVzPMu6CwlMEQwXgjmOij14-o7qj3dW/view

टीम- प्राकृत फूड्स

---------------------------------------------------------------------------------------------------------------------शेतकरी मित्रांनो,  शेतीविषयक शासकीय योजना, शासकीय धोरणे व शासन या विषयात घेत असलेल्या निर्णयांबाबत आपण सर्वसामान्य शेतकरी अनभिज्ञ असतो. त्यामुळेच आपल्या शेतकऱ्यांना शासनाच्या योजना माहिती ही होत नाहीत आणि लाभही मिळत नाही.

             हिच शेतकर्यांची समस्या लक्षात घेऊन

                           प्राकृत फुड्सने हाच शासकिय पातळीवरील व शेतकऱ्यांना मध्ये असलेल्या गॅप भरुन काढून महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन शेतीविषयक निघणारे परिपत्रके, शेतकऱ्यांन संबंधित घेतले जाणारे निर्णय थेट शेतकऱ्यांच्या व्हॉट्सऍप वर उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे

या योजनेत सहभागी होण्यासाठी शुल्क खालील लिंक वरून जमा करावे.

                https://rzp.io/l/8Qan21ocm

गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०

कृषी विभागाच्या योजनांची महाडीबीटी पोर्टल द्वारे अंमलबजावणी करणेबाबत...

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचे जलद गतीने पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी करण्याकरिता नागरिकांनी सर्व शासकीय विभागाच्या विविध योजनांचा लाभ एकाच पोर्टलद्वारे देण्याच्या हेतूने शासनाने महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळातर्फे महाडीबीटी पोर्टल विकसित केले आहे

             कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांशी निगडित विविध योजना राबवण्यात येत असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रत्येक योजनेसाठी लेखी स्वरुपात स्वतंत्र अर्ज करावा लागत होता.  कृषी विभागाने आता महाडीबीटी पोर्टलवर "शेतकरी योजना " सदराखालीं शेतकऱ्यांच्या सोयीकरता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेले आहे या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करायचा आहे. सदर बाबी ज्या योजनेतून देता येऊ शकतील त्या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची संगणकीय सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. यामुळे योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येईल तसेच राज्यात सर्व योजनांच्या अंमलबजावणी एकसूत्रता येईल व वरिष्ठ स्तरावरून योजनांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचे प्रभावी संनियंत्रण करणे शक्‍य होणार आहे.

         चालू वर्षीपासून कृषी विभागाच्या पुढील प्रमुख योजनांची पोर्टलद्वारे अंमलबजावणी करण्यात येत असून उर्वरित योजण्यांची अंमलबजावणी टप्प्या टप्प्याने करण्यात येणार आहे. 

 • ·         प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
 •           मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
 • ·         कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान
 • ·         राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना
 • ·         राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – अन्नधान्य पिके
 • ·         राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – तेलबिया पिके
 • ·         राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – वाणिज्यिक पिके
 • ·         एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
 • ·         भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
 • ·         बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उप योजना क्षेत्रांतर्गत)
 • ·         बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उप योजना क्षेत्राबाहेरील)
 • ·         डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
 • ·         राष्ट्रीय कृषी विकास योजना – रफ्तार योजनेंतर्गत मंजूर होणारे कृषी विभागाचे विविध प्रकल्प

योजनांचे अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : https://mahadbtmahait.gov.in/Farmer/RegistrationLogin/RegistrationLogin

(विविध योजनांसाठी संकेतस्थळावर अर्ज शेतकरी स्वतः सुद्धा आपल्या मोबाईल वरून करू शकतात.)

टीम – प्राकृत फूड्स

महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना व दैनंदिन शेतीविषयक निघणारे परिपत्रके, शेतकऱ्यांन संबंधित घेतले जाणारे निर्णय थेट शेतकऱ्यांच्या व्हॉट्सऍप वर उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे.

                आमच्या व्हॉट्सऍप गृपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर आपली माहिती पाठवा.
       https://wa.me/message/LHK22JQ7S6CXI1

                   धन्यवाद.....

बुधवार, ४ नोव्हेंबर, २०२०

प्राकृत फूड्स विषयी

 प्राकृत फूड्स हे परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या इंद्रायणी देवीच्या परिसरातील गावांमध्ये आरोग्य, शिक्षण, संस्कार, स्वावलंबन व शेती या विषयात  मागील 2 वर्षापासून मानवत तालुक्यातील सारंगापूर या गावी प्राकृत फूड्स सेंद्रिय शेतकरी गटाच्या माध्यमातून शेती विषयात विविध प्रयोग व शासकीय योजनांची माहिती, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, आत्मा विभाग, यांचा माध्यमातून कार्यरत आहे,

                                     गावातील स्थलांतरण रोखण्यासाठी गावातील उपलब्ध कौश्याल्यांचा विचार करून गावात दीपावलीचे उटणे, नैसर्गिक रंग, विविध डाळी व शेतमाल विक्रीच्या यशस्वी प्रयोग करण्यात आले. यातूनच prakrutshop.com या वेबसाईट च्या माध्यमातून परिसरात बनवलेल्या गावातील विविध उत्पादने विक्री सुधा केले जातात.  

सर्वात अलीकडील प्रकाशित पोस्ट

शाळा व वसतिगृहे (आदिवासी विभागाअंतर्गातील ) सुरु करणे बाबत...

                                    राज्यातील आदिवासी विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळांतील विद्यार्थ...

सर्वाधिक लोकप्रिय